नगरमध्ये प्रथमच ‘या’ हॉस्पिटलमध्ये रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लस उपलब्ध...

 जिल्ह्यात प्रथमच 'स्पुटनीक व्ही' लस साईदीप हॉस्पिटल मध्ये उपलब्धनगर: रशियात संशोधन झालेली करोना प्रतिबंधक स्पुटनिक व्ही लस नगर जिल्ह्यात प्रथमच साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. प्रचलित लसीमध्ये स्पुटनिक व्ही अतिशय प्रभावी मानली जाते.   बुधवार दिनाक 8 सेप्टेंबर पासून साईदीप हॉस्पिटल मध्ये ही लस उपलब्ध राहणार आहे अशी माहिती साईदीप हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधक  कोविशिल्ड  लसीही साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून स्पुटनिक व्ही ही लस प्रथमच साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.  8 सप्टेंबर पासून रोज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजे पर्यन्त लस देण्यात येईल. या लसीच्या एका डोसची किंमत 1145 रुपये तर दोन्ही डोसची एकत्र किंमत 2290 रुपये आहे. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस 21 व्या दिवशी घ्यायचा आहे. स्पुटनिक व्ही लसीचे भारतातच डॉ. रेड्डीज लेबोरेटरी मार्फत उत्पादन होत आहे. करोना प्रतिबंधासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post