...तर बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस गोहत्या दिन म्हणून साजरा केला पाहिजे

 ...तर बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस गोहत्या दिन म्हणून साजरा केला पाहिजे....



कोपरगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बेरोजगार दिन साजरा करण्याचा पोरकटपणा युवक काँग्रेस करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहीर केले आहे. मग सत्यजित यांचे मामा व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस गोहत्या दिन म्हणून साजरा केला तर चालेल का, असा सवाल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला आहे.

नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टिका करायला, आंदोलन करायला हरकत नाही. पंतप्रधान झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर पातळी सोडून टिका करतच आहेत. असे कुणीही उठून एका आदर्श व्यक्तीच्या वाढदिवसाला असा आचरटपणा करायला लागले तर यानंतर कुणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त गोहत्या दिन साजरा करू शकतात. कारण संगमनेरमध्ये वर्षानुवर्षे रात्रंदिवस हजारो गायींची हत्या होत आहे. गोहत्येला कायद्याने बंदी असताना कॅबिनेट मंत्र्यांच्या गावात सर्रासपणे गायींची कत्तल होत आहे. म्हणून तुमच्या नेत्यांचा वाढदिवस गोहत्या दिन म्हणून साजरा केला तर तुम्हाला चालेल का, असा सवाल नगराध्यक्ष वहाडणे यांनी सत्यजित तांबे यांना केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post