आ.निलेश लंके हे 'प्रती आर.आर.आबा'....त्यांच्या कार्यावर विद्यार्थी 'पीएचडी' करताना दिसतील

 आ. निलेश लंके यांना राष्ट्रवादीत चांगले भविष्य -अमोल मिटकरीनगर - कोरोनामुळे अर्थ व्यवस्था ढासळली असताना देखील आ. निलेश लंके पारनेर -नगर मतदार संघात शंभर कोटी रुपयाच्या निधीचे काम आणले . त्याच्या काम करण्याची पध्दत पाहून त्यांची कोन्हीही बरोबरी करु नये . राष्ट्रवादी पक्षाला एक साजेसा आमदार तुम्ही लोकानी दिला आहे .आ. लंके याना पुढचे चांगले भविष्य आहे . राष्ट्रवादीला स्व. आर.आर. आबा याची उनीव होती ती निलेश लंके याच्या रूपाने उनीव भरूण निघाल्याचा भास होतो .. लंके यांनी मतदार संघात विकासाची गंगा आणली . त्याच्या कामाची पध्दत पाहून विद्यार्था त्यांच्या नावावर पीएचडी करतील . साधा झोपडीत राहणारा नेता महाराष्ट्राचे भविष्य असेल याबाबत भाजपच्या मनात शंका नाही एवढे काम लंके यांनी केलें असे राष्ट्रवादीचे विधान परीषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी सांगीतले 

 आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत मौजे.निंबळक येथे  मंजूर झालेल्या एक कोटी ऐकये चाळीस रुपये  खालील विविध विकास कामाचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे , सरपंच प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, उद्योजक अजय लामखडे,   घनश्याम म्हस्के, अशोक पवार,  सोमनाथ खांदवे, बाबासाहेब पगारे, श्रीकांत आप्पा शिंदे, भाऊराव गायकवाड, भाऊसाहेब शिंदे तसेच केतन लामखडे, तौफिक शेख, बाळासाहेब साठे  उपस्थित होते. यावेळी लंके म्हणाले पारनेर -नगर मतदार संघातील सर्व कामे मार्गी लावणार . निंबळक चा पाणी प्रश्न जवळपास सुटलेला आहे . जिल्हा परिषदे मध्ये महाआघाडीची सत्ता येणार आहे . माधवराव लामखडे यांनी जिल्हा परिषदेमध्ये मोठी संधी उपलब्ध करून देऊ . यावेळी निंबळक येथे माळवाडी ते निंबळक रस्ता डांबरीकरण करणे-१५.०० लक्ष, माळवाडी ते निंबळक रस्ता सिमेंट काँक्रिट करणे-१५.०० लक्ष, जन सुविधा अंतर्गत स्मशानभूमी विकास करणे-१५.०० लक्ष, निंबळक ते लिंगतीर्थ रोड डांबरीकरण करणे-१८.०० लक्ष, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामे करणे-६०.०० लक्ष आदि कामाचा शुंभारभ करण्यात आला . यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post