पालकमंत्री मुश्रीफ नगरला फिरकत नाहीत...मंत्री जयंत पाटील म्हणाले...

 


पालकमंत्री मुश्रीफ नगरला फिरकत नाहीत...मंत्री जयंत पाटील म्हणाले...नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त नगर दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून विविध विषयांवर भूमिका मांडली. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ 15 ऑगस्टनंतर नगरमध्ये आले नाहीत, याबाबत पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना पाटील यांनी याबाबत कार्यकर्त्यांकडून माहिती घेवू असे सांगत मुश्रीफ यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री आले नसले तरी जिल्ह्यात कामकाज सुरळीत चालू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post