खासदार आणि आमदार जोडीला शुभारंभ केलेल्या विकासकामाचा विसर...मनसेचा निशाणा...

 खासदार आणि आमदार यांची विकासासाठी एकत्र झालेल्या जोडीला शुभारंभ केलेल्या विकासकामाचा विसर पडला की काय ?


मनसेचे नितीन भुतारे यांचा सवाल



 नगर : खासदार आणि आमदार यांनी सक्कर चौक ते नेप्तीनाका रस्त्याचा कामाचा शुभारंभ करून त्यांना विसर पडला असल्याचे दिसुन येत आहे. एक महिन्यात होणारे काम दोन महिने होत आले तरी रस्त्याचे काम सुरू नाही.

विकासकामांसाठी एकत्र आलेली जोडी अचानक शुभारंभ करून गायब झाली आहे. अहमदनगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे व नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सक्कर चौक ते नेप्तीनाका पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा ७ ऑगस्ट २०२१ रोजी शुभारंभ केला होता त्याला जवळपास दोन महिने होत आहेत तरी सुध्दा या कामाला सुरूवात झालेली नाही.

शुभारंभ झाल्यावर एक महिन्यात या रस्त्याचा चेहरा मोहरा बदलणार असे खासदार आणि आमदार यांनी सांगितले होते. शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. असे भाष्य खासदार सुजय विखे यांनी त्यावेळी केले होते. परंतु आज या कामाचा शुभारंभ होऊन दोन महिने होत आले तरी सुद्धा दोघेही जण पुन्हा शहरात विकासासाठी दिसले नाहीत. आज या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. इतके खड्डे झालेले आहेत त्यामुळे या शुभारंभ केलेल्या कामाचा खासदार आणि आमदार यांच्या विकास जोडीला विसर पडला की काय असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थीत झाला आहे.

शुभारंभ झालेल्या या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे या करिता खासदार आणि आमदार यांना या कामाची आठवण व्हावी म्हणुन व लवकरात लवकर या रस्त्याच्या कामाचा व ड्रेनेज लाईनच्या कामाचा प्रश्न मार्गी लावावा या करिता मनसेच्या वतीने स्मरण पत्राद्वारे शुभारंभ केलेल्या कामाची आठवण करून देत आहोत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post