स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षभर उपक्रम

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षभर उपक्रमअहमदनगर-भारताच्या  75 व्या स्वातंत्र्यदिनांच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण)अंतर्गत  शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षेभर  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहीती जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

       अहमदनगर जिल्हा मार्च 2018 मध्ये पायाभुत सर्व्हेक्षणानुसार हागणदारीमुक्त घोषित झाला आहे. सर्व कुटूंबाकडे शौचालयाची उभारणी करण्यात आली असुन या शौचालयांच्या नियमित वापर व्हावा,नादुरुस्त शौचालय दुरुस्त व्हावीत, गावातील  व परीसराची स्वच्छता राहावी यासाठी सांडपाणी व घनकचरा  व्यवस्थापन आदी  उपक्रमांचे जिल्हा स्तरावरुन आयोजन करुन जाणीव जागृती केली जात आहे.

याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या  मार्गदर्शन संचनांनुसार राज्यात 1 सप्टेंबर 2021 ते 15 ऑगष्ट 2022 या दरम्यान विविध उपक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर चालणा-या या उपक्रमांमध्ये गाव हागणमुक्त अधिक करणे,शाश्वत स्वच्छतेसाठी विविध समाज माध्यमांतुन जन-जागृती करणे,सत्याग्रह से स्वच्छाग्रह अंतर्गत दि.15 सप्टेंबर 2021 ते दि.2 ऑक्टोबर 2021 दरम्यान जिल्हयाच्या विविध ग्रामपंचायतीत  स्वच्छतेच्या संदेया देणारा चित्ररथ यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत गाव व परीस्रातील  स्वच्छतेसाठी  ग्रामस्थामार्फत श्रमदानाव्दारे  स्वच्छता  अभियान  राबविण्यात येणार आहे.तसेच  स्वच्छतेविषयी  ग्रामस्तरावर उत्कृष्ट काम काम करणा-या स्वच्छाग्रहीना गौरविण्यात येणार आहे.दि.25 सप्टेंबर 2021 रोजी  पाणी पुरवठा व  स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  स्वच्छतेविषयक चर्चासत्रात जिल्हयातील काही सरपंचांना सहभागी होता येणार आहे.दि.2 ऑक्टोबर 2021 रोजी  सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे.स्वच्छता संवाद या उपक्रमांतर्गत वर्षभरात जिल्हयातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेत स्वच्छता संवादाचे  आयोजन करण्यात आले आहे.स्थायित्व सुजलाम या शंभर दिवसाच्या उपक्रम अंतर्गत  सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन,शौषखडडे,खोदकाम व बांधकाम,नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती,शौचालय उपलब्ध नसलेल्या कुंटुबाना शौचालय उपलब्धी हे उपक्रम  राबविण्यात  येणार आहेत.दि.19 नोव्हेंबर  या जागतिक शौचालय दिनानिमित्त  शाश्वत  स्वच्छता या विषयावंर दृक-श्राव्य माध्यमाव्दारे गावातील पदाधिकारी,ग्रामसेवक व इतर कर्मचा-यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.नवा संकल्प या उपक्रमांतर्गत  कुंटंब स्तरावारील कचरा विलगीकरण,शैाषखडडा व सेफ्टी टँक रिकरमे करणे,वापरा व फेका प्रकारच्या प्लास्टीक वस्तु/पिशव्या न वापरणे या बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.शालेय मुलांसाठी हागणदारी मुक्त गाव या संकल्पनेवर ऑनलाईन वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामिण या विषयावर बालनाटय महोत्सव आयेजित करण्यात येणार आहे.गावातील नागरीकांसाठी स्वच्छता या विषयावर ऑनलाईन प्रश्न मजुंषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षभर चालणा-या उपक्रमांत ग्रामस्थांनी  सक्रिय सहभाग नोंदवुन सर्व उपक्रम यशस्वी करावे असे आवाहन परीक्षीत यादव प्रकल्प संचालक,जलजीवन मिशन जिल्हा परीषद अहमदनगर यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post