घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा... उत्सव गणेशाचा... जागर मताधिकाराचा

 

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र

आणि

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

यांच्या संयुक्त विद्यमाने

 

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा

उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा


 

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून यंदा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेशदेखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा आहे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे,यांसारख्या विषयांवर आपल्या सजावटीतून जागृती करता येऊ शकते.

चला तर मग, बाप्पाचं स्वागत आणि मताधिकाराचा जागर एकाच मखरात करू या...

स्पर्धेची नियमावली :

१.सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

२. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे :

२.१ सदर विषयाला अनुसरून केलेल्या सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.

२.२ सदर फोटो मूळ स्वरूपातील असावेत, त्यावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजा, असे अधिकचे काही जोडू नये. 

२.३ प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त २०० KB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असाव. पाचही फोटोंची एकत्रित साइज १ mb पेक्षा जास्त असू नये.

२.४ आपल्या सजावटीची ध्वनिचित्रफीत पाठवताना, ती कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाचीपाठवावी.

२.५ चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, मूळ रूपात आहे त्या स्वरूपात पाठवावी,कोणत्याही प्रकारे संपादित (एडिटिंग) करू नये. चित्रिकरण करताना देखाव्याचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.

२.६ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त १०० mb असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफित mp4 फॉरमॅटमध्ये असाव.  

३ स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयावर पाच फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

४. आपले फोटोआणि चित्रफीत https://forms.gle/6TxQHaKSAhZmBbQFA या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.

५.ज्या स्पर्धकांना फोटो किंवा चित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी

श्री. अविराज मराठे - ७३८५७६९३२८, श्री. प्रणव सलगरकर - ८६६९०५८३२५, याव्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे.

६. दिनांक १० सप्टेंबर २०२१ ते१९ सप्टेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

७. बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :

अ. प्रथम क्रमांक :-२१,०००/

ब. द्वितीय क्रमांक:- ११, ०००/-

क. तृतीय क्रमांक :-  ५,०००/-

ड. उत्तेजनार्थ :- १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

८.सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देण्यात येईल.

९. आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम सजावटी निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.

१०. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल.

११. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

*****

 

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post