उद्या कोणीही उठेल आणि भूमीपूजन करेन...तो हक्क आमचा आहे...आ.निलेश लंके यांची स्पष्ट भूमिका

उद्या कोणीही उठेल आणि भूमीपूजन करेन...तो हक्क आमचा आहे...आ.निलेश लंके यांची स्पष्ट भूमिका  नगर  : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांना आपल्या काळात मंजुरी मिळाली आहे. त्या कामांसाठी आपण पाठपुरावा केला होता. आता त्यासाठी निधी मंजूर झाल्याने, या कामाचे श्रेय आपलेच आहे. त्यामुळे या कामांचे भूमिपूजन करण्याचा अधिकारही आपलाच आहे, असे आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी विविध कामांचे भूमिपूजन करीत, या कामांमध्ये कोणी खोडा घातला तर आपण सर्वांचे बाप आहोत, असा इशारा दिला होता. औटी यांनी कामांचे भूमिपूजन केले खरे, मात्र दोन महिने उलटले तरी काम सुरूच झाले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते व शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी, कामे सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर आमदार लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लंके म्हणाले, की उद्या कोणीही उठेल व भूमिपूजन करेल आणि काम सुरू झाले नाही म्हणून उपोषणाचा इशारा देईल. याला काहीच किंमत नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे व मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतरच कामे सुरू होतील. एखाद्या रस्त्याची साफसफार्ई सुरू झाली म्हणजे काम सुरू झाले, असे कसे म्हणता येईल, अशी टीका लंके यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post