‘बिग बॉस’ गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

 

 ‘बिग बॉस’ गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन‘बिग बॉस’चा 13 वा सीझन गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरूवारी निधन झाले.  हृदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घ्यावा, यावर अद्यापही चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. सिद्धार्थ शुक्लाच्या मागे आई व दोन बहिणी आहेत. सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती. पण नंतर तो उठलाच नाही. त्याने कोणती औषधं घेतली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रूग्णालयात नेले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. रूग्णालयाने त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट केले आहे. गुरूवारी पहाटे रूग्णालयात येण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे रूग्णालयाने म्हटले आहे.

सिद्धार्थ शुक्ला टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा होता. बिग बॉसचा 13 सिझन त्यानं जिंकला होता. याशिवाय ‘खतरों के खिलाडी 7’चाही तो विजेता होता. बालिका वधू या मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post