तहसील प्रशासनाकडूनच करोना प्रतिबंध नियम पायदळी, कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

 

तहसील प्रशासनाकडूनच करोना प्रतिबंध नियम पायदळी, कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाशेवगाव - (संदीप देहाडराय) - संपूर्ण जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना शेवगाव तहसिल कार्यालयात मात्र कोरोना विषयक नियमांना हरताळ फासला असून या नियमांची पायमल्ली प्रशासनातील प्रमुख अधिका-यांच्या उपस्थित झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. निमीत्त होते बदलून गेलेल्या तहसिलदार यांचा निरोप व नव्याने बदलून आलेले तहसलिदार यांचा स्वागत समारंभ.. विशेष म्हणजे कोरोना नियमांची अमलबजावणी करण्याची जबाबदारी असणारे सर्व विभाग प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते.

      राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात व आटोक्यात येत असतांना गेल्या महिनाभरापासून नगर जिल्हयातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेवगाव तालुका जिल्हयात तिस-या व चौथ्या क्रमांवर असतो. असे असतांना ही प्रशासनाचे प्रमुख असणारे अधिकारीच जर असा समारंभ घडवून आणण्यास हातभार लावत असतील तर रुग्ण संख्या कशी आटोक्यात येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.  बुधवार ता.२२ रोजी येथील तहसिल कार्यालयात बदली झालेल्या तहसि्लदार अर्चना भाकड- पागिरे यांचा निरोप समारंभ व नव्याने बदलून आलेले तहसिलदार छगन वाघ यांचा स्वागत समारंभ आयोजीत करण्यात आला होता. त्यात महसुल संघटनेचा पुढाकार होता. हा समारंभ पार पडतांना कुठलेही सामाजिक अंतर पाळले गेले नाही. तसेच उपस्थित असणारे अधिकारी, कर्मचारी व नागरीकांपैकी बहुतांश जणांच्या तोंडाला मास्क लावलेला नव्हता. या कार्यक्रमास ग्रामिण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक, वैदयकीय अधिकारी, निवासी नायब तहसिलदार   नायब तहसिलदार यांच्यासह मंडलाधिकारी, तलाठी, तहसिल विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

  कारवाई कोण करणार ?  - 
कोरोनाची तिसरी लाट नगर जिल्हयातून सुरु होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कोरोना विषयक नियमांची कडक अमलबजावणी दिले आहेत. मात्र असे असतांनाही ज्यांच्याकडून नियमांची अमलबजावणी व्हावी अशी तालुक्यातील प्रशासकीय प्रमुखच अशा बेजाबदारपणे कोरोनाचा प्रसार होण्यासाठी हातभार लावत असतील तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकांना पडला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post