नगर जिल्ह्यात कर्ज प्रकरणावरुन मनसे जिल्हाध्यक्षाची पतसंस्था अध्यक्षाला मारहाण, गुन्हा दाखल

नगर जिल्ह्यात कर्ज प्रकरणावरुन मनसे जिल्हाध्यक्षाची पतसंस्था अध्यक्षाला मारहाण, गुन्हा दाखल नगर - मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खेडकर यांचे चुलते दिनकर खेडकर (रा. एकनाथवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे, की मी खरवंडी येथील एका पतसंस्थेचा अध्यक्ष आहे. या संस्थेतून देविदास खेडकरने कर्ज घेतले होते. कर्ज न फेडल्याने देविदासविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. त्याचा राग धरून आज (ता. २९) सकाळी आपण एकनाथवाडीहून दुचाकीवरून चाललो असता, देविदास खेडकरने चारचाकीची धडक दिली. त्यामुळे मी खड्ड्यात पडलो. त्याचा जाब विचारला असता, त्याने शहादेव रावसाहेब खेडकर व इतर तीन अनोळखी व्यक्तींसह आपणास व पत्नीस मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील तपास करीत आहेत.

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post