देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात

देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात पुणे: देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका, असं खळबळजनक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं आहे. 

किरीट सोमय्या प्रकरणावरून आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर हा सल्ला तुम्ही देवेंद्र फडणवीसानां दिला होता का जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याचवेळी अजित पवारांसोबत शपथ घेणं ही ही कॅल्कुलेटेड रिस्क होती असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post