मनसेच्यावतीने शाडू मातीच्या श्रीगणेशाचे मोफत वितरण

 मनसेच्यावतीने शाडू मातीच्या श्रीगणेशाचे मोफत वितरण


प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती पर्यावरणास घातक - सुमित वर्मा     नगर - श्री गणेश ही अद्यदेवता असून, महाराष्ट्रासह जगभर श्रीगणेशाची आज प्रतिष्ठापना होत आहे. परंतु श्री गणेशाची मुर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविल्या जातात, त्या पर्यावरणासाठी घातक असल्याने नागरिकांनी शाडू मातीच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करावी. मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होण्यासाठी जनजागृती करुन नागरिकांना श्रीगणेश मूर्तीचे व पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. यासाठी शाडू मातीच्या गणपतीचे वितरणही गेल्या 4-5 वर्षापासून केले जात आहे. यंदाही लकी ड्रॉ पद्धतीने भाविकांना शाडू मातीच्या श्रीगणेशाचे मोफत वितरण केले आहे. या उपक्रमांमुळे भाविकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.

     महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने 101 नागरिकांना शाडू मातीच्या श्री गणेश मुर्ती लकी ड्रॉ पद्धतीने मोफत देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा,  प्रकाश गायकवाड , संकेत जरे , ओंकार काळे , स्वप्निल वाघ , राजू लाळगे उपस्थित होते.

     याप्रसंगी भाविकांनीही शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापनेचा संकल्प करुन मनसेच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post