भाजपला धक्का... नगराध्यक्ष तसेच ११ नगरसेवक शिवसेनेत दाखल...

 भाजपला धक्का... नगराध्यक्ष तसेच ११ नगरसेवक शिवसेनेत दाखल...मुंबई : भाजपचा गड असलेल्या जळगावात भाजपला मोठे धक्के बसत आहेत. आज बोदवडमधील 11 नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

आज भाजपच्या बोदवडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 11 नगरसेवक यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय. पूर्वी मुक्ताईनगरचे 6 नगरसेवक शिवसेनेते दाखल झाले होते. आज मुक्ताईनगरचे गटनेतेही शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच अर्थ तिथल्या आमदारांनी केलेली कामं आणि जनतेचा मिळवलेला विश्वास आणि उद्धव साहेबांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. येणाऱ्या काळात मुक्ताईनगर जिल्हा परिषदेमध्येही अशीच स्थिती राहील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post