भाजप आमदार म्हणतात...तो मी नव्हेच ! माफी मागण्याचा प्रश्नच नाही

 

भाजप आमदार म्हणतात...तो मी नव्हेच ! माफी मागण्याचा प्रश्नच नाही  पुणे : पुण्यातील भाजपच्या आमदाराने  एका महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण, ती ऑडिओ क्लिप माझी  नाहीच, त्यात असणारा आवाज सुद्धा माझा नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असं स्पष्टीकरत भाजपचे आमदार सुनील कांबळे  यांनी दिलं आहे.

'जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे ती माझी नाही.आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझी बदनामी करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केली जात आहे. त्यात असणारा माझा आवाज नाही. हे विरोधकांचं षडयंत्र आहे, असं सुनील कांबळे म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post