राष्ट्रवादी जास्त दिवस टिकणारा पक्ष नाही, कधीही विसर्जित होऊ शकतो

राष्ट्रवादी जास्त दिवस टिकणारा पक्ष नाही, कधीही विसर्जित होऊ शकतोपुणे: 'गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, अशी एक म्हण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचंही तसंच आहे. हा पक्ष जास्त दिवस टिकणारा नाही. कधीही विसर्जित होऊ शकतो,' अशी बोचरी टीका भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

 जुन्नरमधील बेल्हा इथं झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा व जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना पडळकर बोलत होते.  

'आमचा पक्ष लोकशाही पद्धतीनं चालणारा आहे असं राष्ट्रवादीवाले वारंवार सांगत असतात. मात्र या पक्षात खरंच लोकशाही आहे का? हा प्रश्नच आहे. या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कधीच बदलत नाही. या पक्षाची व्याख्याच वेगळी आहे. हा पक्ष कधीही विसर्जित होऊ शकतो,' असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post