स्वत: उध्दव ठाकरेंकडेही बेनामी बंगले, चौकशी तर होणारच....भाजप नेत्याचा गंभीर आरोप

स्वत: उध्दव ठाकरेंकडेही बेनामी बंगले, चौकशी तर होणारच....भाजप नेत्याचा गंभीर आरोप सांगली : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आरोपांचा भडीमार सुरू केला आहे. सोमय्या यांनी सोमवारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली आणि तासगावच्या मालमत्तांचे फोटो काढले. यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब  यांच्यावर गंभीर आरोप करत ते म्हणाले की, परब यांची बेनामी संपत्ती खरमटे यांच्या नावावर आहे. आरटीओ अधिकारी खरमाटे हे अनिल परब यांचे जवळचे मानले जातात 

 सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे  यांच्याकडे १९ बेनामी बंगले असल्याचा आरोप केला. म्हणूनच ठाकरे सरकार बेनामी सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, ते दिवाळीपर्यंत ठाकरे इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह १२ लोकांचे घोटाळे उघड करतील. ठाकरे यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, असेही ते म्हणाले. जर त्यांनी घोटाळा केला असेल तर ठाकरे सरकारने त्याची चौकशी करून बघावी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post