नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ४ जण ठार

 

नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ४ जण ठारनगर : नगर-पुणे महामार्गावर जातेगाव (ता. पारनेर) शिवारात दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहीती आहे.

दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवारात हा अपघात झाला असून सुपे पोलिस क्रेनच्या मदतीने वाहनांमध्ये, वाहनाखाली अडकलेले मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

पुण्यावरून नगरकडे  चाललेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणाया ट्रकची कंटेनरला जोराची धडक बसली. दरम्यानच्या काळात दोन्ही वाहनांच्या मधोमध चाललेल्या दुचाकीलाही ट्रकने ठोकर दिल्याने दुचाकी ट्रकखाली जाउन त्यावरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

अचानक ब्रेक लावण्यात आल्याने ट्रकमधील पाईप बॉडी तोडून केबीनमध्ये शिरले. त्यात ट्रकच्या चालकासह क्लिनरचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. ट्रकमध्ये आणखी किती व्यक्ती आहेत, याची अदयाप पोलिसांकडे माहीती नसून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post