पेट्रोल भरताना मोदी फोटोतून म्हणतात...कशी जिरवली तुझी....इंधन दरवाढीवर अजितदादांचा खोचक टोला

  पेट्रोल भरताना मोदी फोटोतून म्हणतात...कशी जिरवली तुझी....इंधन दरवाढीवर अजितदादांचा खोचक टोलापेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही आपल्या विशेष शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर  ताशेरे ओढले आहेत. 

बारामतीतल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “आत्तापर्यंत अनेक पंतप्रधान देशाला मिळाले. आता मोदी साहेब आहेत. त्यांनी कुठलाही पंप असला, तिथं त्यांचा फोटो लावायचाच..हे कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही गंमतीने म्हणतो की, पेट्रोल शंभरच्या पुढं गेलं, पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं आणि ते म्हणतात, कशी तुझी जिरवली”.

ठिकठिकाणी दिसणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरुन ते म्हणाले, “मी एवढी कामं करतो पण कधी फलक पण लावत नाही. काय फलक लावायचे आहेत? तुम्ही घरची माणसं आहात. त्याच्याकरिता तुम्ही मला निवडून दिलं आहे. आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे. पण, प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असते. आपण लस घेतो त्या फॉर्ममध्ये देखील फोटो असतो. काही जण म्हटले, आम्ही वर गेल्यानंतर सर्टिफिकेट मिळतं त्याला पण त्यांचा फोटो लावा. अशा टीकाटिप्पण्या काही जण करतात”.

आज ते देशाचं पंतप्रधान पद भूषवत आहेत. आज त्यांच्या एकट्याच्या ताकदीवर भाजपा ग्रामीण भागात निवडून आली आहे. त्यांच्या नावावर कितीतरी लोक निवडून आले आहेत, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post