करोना महामारी कधी संपणार? लस उत्पादकाचा मोठा खुलासा....

करोना महामारी कधी संपणार? लस उत्पादकाचा मोठा दावा पुढील वर्षभरात कोरोनाची साथ पूर्णपणे संपुष्टात येईल, असा विश्वास मॉडेर्ना या लसउत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीफन बॅन्सेल यांनी व्यक्त केला आहे. जगभरात वाढती मागणी लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधक लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात आहे.   


स्वित्झर्लंडच्या एका वृत्तपत्राला मुलाखत देताना स्टीफन बॅन्सेल म्हणाले की, जगामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे प्रचंड प्रमाणावर उत्पादन होत आहे. अशा रीतीने जगभरातील जास्तीत जास्त लोकांना ही लस मिळून कोरोनाची साथ पुढील वर्षभरात पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, लस मिळालेल्या व्यक्तींना कोरोना विषाणूपासून संरक्षण प्राप्त झाले आहे. मात्र ज्यांना अद्याप लस उपलब्ध झालेली नाही त्यांना संसर्गाचा मोठा धोका आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post