नगर बाजार समितीला नोटिस, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले....

 


नगर बाजार समितीला नोटिस, मंत्री तनपुरे म्हणतात अधिकारी कायद्यानुसार काम करतात...



नगर : नगर तालुका बाजार समितीतील सत्ताधार्‍यांना नुकतीच जिल्हा उपनिबंधकांनी नोटिस बजावली आहे. बाजार समितीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनीही केला आहे. त्यावर सत्ताधार्‍यांनी मंत्र्यांच्या दबावाखाली अशा नोटिसा दिला जात असल्याचा आरोप केला होता. बाजार समिती सत्ताधार्‍यांच्या या आरोपाला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उत्तर दिले आहे. नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांचे ऐकून कामे करत नाहीत. त्यांना कायदा व नियम दिसतात. ते कायद्याचे ऐकतात. कायद्यानुसारच कामे करतात, असा टोला तनपुरे यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post