जि.प. प्राथमिक शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, नगर जिल्ह्यातील घटना

 जि.प. प्राथमिक शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, नगर जिल्ह्यातील घटनानगर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या  शिक्षकाने पाच ते सहा अल्पवयीन विद्यार्थींनी  सोबत अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात  विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. एका विद्यार्थींनीच्या पालकाने फिर्याद दिली आहे.

संतोष एकनाथ माघाडे (वय 34 रा. गंगापूर जि. औरंगाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक  केली आहे. तो नगर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेचा शिक्षक आहे. सध्या करोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन शिक्षण  सुरू आहे.


ऑनलाईन शिक्षणासाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश आहे. शिक्षक संतोष माघाडे हा ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थींनीना शाळेत बोलून घेत असे व त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थींनी घरी हा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सानप करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post