हमीभावासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 शेतमालाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन           नगर   :- खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये शासनाची आधारभुत किंमत खरेदी योजना अंतर्गत शेतमाल मका, बाजरी व ज्वारी  या शेतमालाची हमीभाव योजनेमध्ये शेतकरी नोंदणी करण्याकरीता मार्केटींग फेडरेशन मार्फत सब एजेंट संस्था नियुक्त करुन राबवीली जात आहे. त्याकरीता शासनाच्या  ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरीता दिनांक 3 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यत मका, बाजरी व ज्वारी या शेतमालाची नोंदणी प्रक्रिया जिल्हयातील  राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, कर्जत, खर्डा- जामखेड या आठ तालुक्यांमध्ये खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.  


            शेतमाल नोंदणी करीता शेतक-यांचे 8 अ, शेतकरी 7/12 उतारा(तलाठी पिक पेरा नोंद प्रमाणपत्र आवश्यक आहे.), चालु हंगामातील शेतमालाची ऑनलाईन पीक पेरा नोंदणी असावी. शेतकरी आधारकार्ड छायांकीत प्रत. बँक खाते पासबुक छायांकीत प्रत (शक्यतो कॅन्सल केलेला चेक किंवा बँक खातेबाबत पुर्ण माहिती असलेले बँक स्टेटमेंट) बँक खाते हे जनधन नसावे तसेच बंद झालेले बँक खाते नसावे. अन्यथा खरेदी झालेल्या मालाची रक्कम बँक खाती जमा होत नाही. याची नोंद शेतक-यांनी घ्यावी. तरी जिल्हयातील शेतक-यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन हनुमंत पवार, जिल्हा मार्केटींग अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post