राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, चंद्रकांत पाटील म्हणतात अर्ज बाद होणार...

राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल\ कोणताही धोका नको म्हणून दोन अर्ज केले दाखल

पहिला अर्ज अजित पवार आणि नाना पटोले यांच्या उपस्थित 

तर दुसरा अर्ज बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित दाखल करण्यात आला

महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या प्रत्येकी १० आमदारांच्या स्वाक्षरीने उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, खा. बाळू धानोरकर, खा. सुप्रिया सुळे, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

द्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलतानादावा केला आहे. रजनी पाटील यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहेत. छाननी करताना त्या बाहेर पडतील, असा दावा पाटील यांनी केला. मात्र, काय ऑब्जेक्शन आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मी कशाला सांगू. उद्यासाठी काही हवं की नाही, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post