हॅप्पी बर्थडे कुंती, तुझ्यासाठी माझी ओंजळ सतत भरलेली राहो...आ. रोहित पवारांच्या खास शुभेच्छा

   


कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी त्यांच्या सहचारिणी कुंती पवार यांचाही वाढदिवस असतो. पत्नीच्या वाढदिवसाला रोहित पवार यांनी खास फेसबुक पोस्ट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


हॅप्पी बर्थडे कुंती, तुझ्यासाठी माझी ओंजळ सतत भरलेली राहो

फेसबुकवर केलेल्या पोस्टमधून रोहित पवारांनी पत्नीचं आपल्या आयुष्यातील स्थान विषद करताना त्यांचं भरभरुन कौतुक केलंय. “कुतींला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तिला देण्यासाठी माझी ओंजळ सतत आनंदाने भरलेली राहो आणि तिला दीर्घायुष्य लाभो”, अशी प्रार्थना रोहित पवार यांनी केली आहे.

घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या, जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या जीवनसाथी सौ. कुंतीचाही माझ्यासोबतच आज वाढदिवस. यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा! तिला देण्यासाठी माझी ओंजळ सतत आनंदाने भरलेली राहो आणि तिला दीर्घायुष्य लाभो,ही प्रार्थना, अशा शब्दात रोहित पवार यांनी पत्नी कुंती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post