भुजबळांविरोधात याचिका मागे घ्या, शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्ड डॉन कडून धमकी...

 

भुजबळांविरोधात याचिका मागे घ्या, शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्ड डॉन कडून धमकी...नाशिक : नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. तसा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर आहे म्हणत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post