आपल्या व आधीच्या सरकारमध्ये काय फरक राहिल? आ.रोहित पवार सुध्दा राज्य सरकारवर नाराज

 


आपल्या व आधीच्या सरकारमध्ये काय फरक राहिल? आ.रोहित पवार सुध्दा राज्य सरकारवर नाराजनगर : आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होवून लेखी परीक्षा शनिवारी व रविवारी होणार होती. मात्र ऐनवेळी ही परीक्षाच रद्द करण्यात आल्याने राज्यातील लाखो उमेदवार नाराज झाले आहेत. विरोधकांकडून या मुद्दयावरुन राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करीत घरचा आहेर दिला आहे. आ.रोहित पवार यांनी याबाबत व्टिट केले आहे. मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले,परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय. त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का,याचा विचार व्हावा. तसंच पारदर्शकतेसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा. सध्या प्रत्येक पदासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी आकारली जाते, हे योग्य नाही. सरकारने यात लक्ष घालून परिक्षार्थींच्या हिताचा निर्णय घ्यावा, ही विनंती!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post