महाराष्ट्र हादरला, एकतर्फी प्रेमातून युवतीची गळा चिरून हत्या...


महाराष्ट्र हादरला, एकतर्फी प्रेमातून युवतीची गळा चिरून हत्या...सातारा:  एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरुणाने भरदिवसा 18 वर्षीय मुलीची भर चौकात गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात समोर आली आहे. आहे.  पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी मुलीची हत्या करुन पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वत:हून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चैतन्या बाळू बंडलकर असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. तर अनिकेत मोरे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.संबंधित घटना ही चाफळ येथीव स्वागत कमानीजवळ सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी अनिकेत हा दुचाकीने आला होता. तो चैतन्यासोबत काहीच बोलला नाही. त्याने गाडीवरुन उतरुन आधी चैतन्याचं तोंड दाबलं. त्यानंतर दुसऱ्या हातात असलेल्या चाकूने तिची गळा चिरुन हत्या केली. चैतन्या रक्तबंबाळ अवस्थेत जमीनीवर खाली कोसळली. या हल्ल्यात चैतन्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी अनिकेत दुचाकीने पोलीस ठाण्यात गेला. तिथे जमा होऊन त्याने आपल्या कृत्याची पोलिसांना माहिती दिली.

मृतक चैतन्याची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. त्यांची काही दिवसांपूर्वी चाफळ नजीकच्या नानेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली होती. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहत होत्या. आरोपी अनिकेत आणि चैतन्य एकाचा तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते. त्यातून तो तिला भेटायला येत होता. अनिकेतने काही दिवसांपूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने चैतन्यासोबत लग्नाची मागणी घातली होती. पण अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो. त्यामुळे याबाबत पुढे काही झालं नाही. त्यानंतर अचानक हत्येची घटना समोर आली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post