माजी मंत्री राम शिंदे यांना आ.रोहित पवारांनी जेरीस आणले, खा.विखेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष


माजी मंत्री राम शिंदे यांना आ.रोहित पवारांनी जेरीस आणले, खा.विखेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्षनगर ः आ. रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून कर्जत जामखेड मतदारसंघात राजकीय समीकरणच बदलून गेले आहे. विधानसभेला दिग्गज नेते प्रा. राम शिंदे यांना पराभूत केल्यानंतर पवार यांनी संपूर्ण मतदारसंघावर पकड घट्ट केली आहे. 

कर्जत शहर व तालुक्यात मोठे राजकीय वजन असलेल्या नामदेव राऊत यांनी आज अधिकृतरित्या भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. राऊत यांचा राजीनामा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून राऊत हे भाजपात नाराज असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी सरचिटणीस ढोकरीकर बंधूंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्यासोबतच कर्जत नगर पंचायतीचे नगरसेवकही होते. 

राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. कर्जत शहरात राष्ट्रवादीची ताकद नगण्य होती. परंतु आता ती वाढणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. आगामी नगर पंचायत ताब्यात घेण्याच्या इराद्यानेच राष्ट्रवादी कामाला लागली आहे. राऊत यांच्या राजीनाम्याने भाजपचे वर्तुळात सन्नाटा पसरला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post