कोविड काळात विशेष योगदान देणाऱ्या सहकाऱ्याला आ.लंके यांनी दिला न्याय

 सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस सेलच्या पारनेर तालुका कार्याध्यक्ष पदी  नितीन मुरकुटे यांची निवड ! 


कोविड काळात विशेष योगदान देणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला आ.लंके यांनी दिला न्याय !पारनेर  -  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मतदार संघातील संघटन मजबूत करण्यासाठी पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भर दिला असून मतदार संघात पक्षाशी एकनिष्ठ राहात सामाजिक कार्य करणाऱ्या युवक वर्गाला न्याय देण्याचे काम आमदार निलेश लंके यांनी सुरू केले आहे.

        राष्ट्रवादी पक्षाशी व पक्ष नेतृत्वाशी प्रामाणिक असणाऱ्या युवा सहकाऱ्यांना राजकारणात योग्य न्याय मिळावा म्हणून कार्यरत असणारे आमदार निलेश लंके व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी तालुक्यातील निष्ठावान तरुणांची यादी तयार केली असून त्यांना त्यांच्या कार्याची पावती पदाच्या रूपाने दिली जात आहे .

      राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची कार्यकारणी तालुका प्रमुख तरटे व आमदार लंके यांच्या मार्गदर्शना खाली तयार केली असून त्यात कोवीड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अविरत योगदान देणारे व राष्ट्रवादीचे संघटन वाढीमध्ये नेहमीच हिरारीने भाग घेणारे व सर्वसामान्यांचे मूलभूत न्याय्य हक्कासाठी झटणारे भाळवणी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य , नितीन मुरकुटे यांना सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी सेलच्या कार्याध्यक्ष पदी तर सचिन पोपट आल्हाट, दिपक बाळासाहेब जाधव,मच्छिंद्र साळवे , सुरेश बबनराव खरात , शैलेश बबन रोकडे , प्रवीण अशोक साळवे,अमोल सुरेश सोनवणे,रामदास दशरथ साळवे,शांताराम देवराम वाघ,अतुल पोपट भंडालकर यांची निवड करत पक्षावर व नेतृत्वावर असणाऱ्या निष्ठेला न्याय दिला.

         त्यात तुषार भगवंत बोरगे,यांची तालुका अध्यक्षपदी तर अशोक बाळासाहेब गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड  करत यांच्या सह एकूण 13 सदस्यांना या कार्यकारिणीवर नेमणूक करत त्यांना आमदार निलेश लंके राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे,राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान खात्याचे राज्याचे अध्यक्ष जितेश सरडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र सुपूर्द करण्यात आले .

         सामाजिक न्याय विभाग अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष श्री.अभिजित भाऊसाहेब ससाने यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीवर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कार्याध्यक्ष नितीन मुरकुटे व सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post