नगरमधील उड्डाणपूलाच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा सुरु

 नगरमधील उड्डाणपूलाच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा सुरुनगर : नगर शहरात स्टेशन रोडवरील उड्डाणपुलाच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा सुरु झाला  आहे. जवळपास 80 हून अधिक पिलर उभे राहिल्यानंतर आता हे पूल जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अवजड मशीनरीच्या सहाय्याने हे अतिशय जिकीरीचे काम सुरु करण्यात आले आहे. पहिला सेगमेंट काल रात्री उभारण्यात आला असून मार्केट यार्ड चौकातून हे काम सुरु झाले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर पूलाला आकार येणार असून नगरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. या कामामुळे स्टेशन रस्त्यावरील वाहतूकीवर परिणाम होणार असल्याने बहुतांश काम रात्रीच्या वेळी वाहतूक बंद करून करण्यात येत आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post