शिक्षक बँकेत तांबे गटाला धक्का, रोहकले प्रणित गुरुमाउली मंडळ पुन्हा सत्तेत...

 अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे तर व्हा. चेअरमन पदी गंगाराम गोडे यांची निवड

                                                            



अहमदनगर- शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी अविनाश निंभोरे तर व्हा चेअरमन पदी गंगाराम गोडे यांची निवड जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यांना सहकार्य बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांचे लाभले
  या निवडीत  श्री. अविनाश निंभोरे हे १३ मते मिळवून चेअरमन तर व्हा. चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची बिनविरोध निवड झाली. अविनाश निंभोरे यांना सूचक म्हणून माजी व्हा. चेअरमन नानासाहेब बडाख तर  राजू मुंगसे  यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या होत्या. शिक्षक परिषदेचे नेते रावसाहेब रोहोकले, संजय शेळके, प्रवीण ठुबे, विकास डावखरे, संजय शिंदे,भाऊसाहेब ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड झाली.
    यावेळी बँकेच्या संचालक  सीमाताई क्षिरसागर, उषाताई बनकर ,मंजुषाताई नरवडे, विद्युल्लताताई आढाव ,संतोष अकोलकर ,दिलीप  औताडे ,राजेंद्र मुंगसे, नानासाहेब बडाख ,संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, अनिल भवार  सलीमखान पठाण, सुयोग पवार,किसन खेमकर, बाळासाहेब मुखेकर, बाबा खरात, राजू रहाणे, साहेबराव अनाप आदी उपस्थित होते.





0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post