जिल्हा परिषद शाखा अभियंत्यावर निलंबनाची कारवाई

 जि.प.विद्युत विभागाच्या शाखा अभियंत्यावर निलंबनाची कारवाईनगर :  ग्रामपंचायतीच्या विद्युत कामाच्या अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिकेबाबत मागणी करून ते तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही. तसेच दुसर्‍या त्रयस्थ यंत्रणे मार्फत बेलापूर ग्रामपंचायतीच्या विद्युत कामाची तपासणी केली असता त्यात तफावत आढळून आल्याने जिल्हा परिषदेचे विद्युत विभागाचे शाखा अभियंता बी.बी. चौधर यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

ते नगरला विद्युत विभागात शाखा अभियंता पदावर कार्यरत आहेत. बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील ग्रामपंचायतीत झालेल्या विद्युत कामाच्या अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिकेबाबत मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी करूनही त्यांनी उपलब्ध करून दिले नाही. यामुळे या कामांची स्वतंत्रपणे शासकीय तंत्रनिकेतन नगर (विद्यूत विभाग) यांच्यावतीने तांत्रिक तपासणी आणि चौकशी करण्यात आली.

या अहवालात चौधर यांनी नमुद केलेले परिमाण यात तफावत आढळून आली. यावरून शाखा अभियंता यांनी या कामात गैरव्यवहार केला असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) च्या तरतुदीनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post