मनपाकडून मोफत नगर दर्शन बससेवा....ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी

 नगर दर्शन बस सेवेतून नवीन पिढीला इतिहास  कळेल- महापौर  रोहिनीताई शेंडगे नगर - जागतिक पर्यटन दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त अहमदनगर महानगरपालिकेने शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची ओळख नवीन पिढीला व्हावी आणि आपल्या इतिहासा बद्दल आदर निर्माण व्हावा या हेतूने नगर दर्शन बस सेवेचा शुभारंभ  महापौर रोहिनीताई शेंडगे यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी उपमहापौर  गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, महिला बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती  पुष्‍पाताई बोरूडे, माजी महापौर  सुरेखाताई कदम ,माजी नगरसेवक  .संजय शेंडगे, माजी शिवसेना शहर प्रमुख  संभाजी कदम, नगरसेवक  सचिन शिंदे, मदन आढाव,  प्रशांत गायकववाड,  .रामदास आंधळे, माजी.नगरसेवक संजय चोपडा,  शिंदे,  संतोष गेणाप्‍पा, जल अभियंता  परिमल निकम,मनपा प्रसिद्धी अधिकारी  शशिकांत नजान, इतिहास तज्ञ भूषण देशमुख,  पंकज मेहेर,  प्रतिक महेरे,  अशोक बास्‍कर, सतिष घुले,  स्‍वयंम बास्‍कर, शहर बस सेवेचे संचालक  आशिष शिंदे, महेश गाडे, व्यवस्थापक  रावसाहेब काकडे,  राजेश लयचेट्टी, वाहन विभागाचे  उमेश आहेर आदी उपस्थित होते.  


       यावेळी बोलताना  शेंडगे म्हणाल्या की नगर दर्शन बस सेवा या उपक्रमातून नवीन पिढीला आपल्या शहराचा इतिहास कळेल यातून आदर्श आणि प्रेरणा घेऊन ही पिढी अधिक सशक्त होईल.या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद द्यावा असेही त्या म्हणाल्या. प्रथमत: एक महिन्‍यासाठी सुटीच्‍या दिवशी शनिवार व रविवार ही सेवा मोफत उपलब्‍ध करून देण्‍यात आलेली असून ज्‍या धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणी तिकीट दर असेल ते नागरिकांना भरावे लागतील. नगर दर्शनसाठी नागरिकांना ऑन लाईन ऑफ लाईन नोंदणी करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एस.टी स्‍टॅण्‍ड चौक समोरील शहर बस वाहतुकीचे बस स्‍टॉप येथे नोंदणी करता येईल. तसेच नगर दर्शनसाठी नागरिकांनी नोंदणी केल्‍यानंतर प्रत्‍येक शनिवार रविवार सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीचे दर्शन घेवून माळीवाडा येथून बस सुरूवात होईल. त्‍यानंतर मेहेराबाद- आनंदधाम- फराहबक्ष महाल- रणगाडा म्‍युझियम- भुईकोट किल्‍ला- चांदबिबी महाल – ऐतिहासिक वस्‍तु संग्रहालय आणि पुन्‍हा माळीवाडा असा क्रम असेल. 

 नोव्‍हेंबर 2021 पासून दर शनिवार रविवार ही बससेवा उपलब्‍ध असून नागरिकांना ऐतिहासिक स्‍थळांना भेट देण्‍यासाठी तिथे जे तिकीट असेल ते  तसेच ऐतिहासिक ,धार्मिक ठिकाणचे तिकीट नागरिकांना स्‍वत: काढावयाचे आहे. ही सेवा सुरू केल्‍यामुळे नागरिकांना शहर व परिसरातील ऐतिहासिक व धार्मिक वास्‍तुंची माहिती होणे सुलभ होईल याकरिता नागरिक, विद्यार्थी व पर्यटक यांनी लाभ घ्‍यावा या माध्‍यमातून शहराच्‍या ऐतिहासिक धार्मिक वास्‍तुचे नांव लौकिक वाढण्‍यास मदत होईल.  


      यावेळी उपमहापौर  गणेश भोसले म्‍हणाले की, नगर शहराला ऐतिहासिक, धार्मिक वास्‍तुंची वारसा असून शहरामध्‍ये इतिहास प्रेमी मोठया प्रमाणात आहे. बरेच नागरिक सुटीच्‍या दिवशी ऐतिहासिक व धार्मिक वास्‍तुस भेट देत असतात. अशा स्‍थळांना भेट देण्‍यासाठी सुविधा नसल्‍याने इच्‍छा असूनही काही ऐतिहासिक प्रेमींना जाता येत नाही. आता ही सुविधा सुरू झाल्‍याने सर्व नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

    


      माहितीसाठी संपर्क मनपा प्रसिध्‍दी अधिकारी  शशिकांत नजान – 9850146611,  बुकींगसाठी शहर बस सेवा व्‍यवस्‍थापक  रावसाहेब काकडे – 7774087181

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post