करूणा शर्मांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला...

करूणा शर्मांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला...



 बीड : करुणा शर्मा  त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता येत्या सोमवारी म्हणजे 20 सप्टेंबरला जामीनावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे अजून दोन दिवस तरी त्यांना कोठडीतच काढावे लागणार आहेत.

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर 14 सप्टेंबरला अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.  त्यावेळी ही सुनावणी 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post