खाजगी प्रवासी बसेस वाहनांकडून मनमानी भाडे आकरणीच्या तक्रारी 'येथे' करा

 खाजगी प्रवासी बसेस वाहनांकडून मनमानी भाडे आकरणीच्या तक्रारी            अहमदनगर दि. 07 :- परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गाचे टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणा-या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही. असे कमाल भाडेदर शासनाने दिनांक 7 एप्रिल, 2018 रोजी शासन निर्णय जारी करुन निश्चित केले आहेत. तथापी गर्दीच्या हंगामाच्या काळात प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केली जात असल्यास संबंधित प्रवाशांनी ई-मेल आयडी  mvdcomplaint@gmail.com  यावर तक्रार नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. तरी आपली खाजगी कंत्राटी परवाना वाहनांबाबत काही तक्रार असल्यास नमुद ई-मेल आयडीवर नोंदविण्यात यावी. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post