आ.रोहित पवार यांचे जामखेडकरांना मोठं गिफ्ट, पाणी योजनेसाठी 'इतक्या' कोटींचा निधी मंजूर


आ.रोहित पवार यांचे जामखेडकरांना मोठं गिफ्ट, पाणी योजनेसाठी 138.84 कोटींचा निधी मंजूरनगर :  जामखेड शहराचा बहुप्रलंबित पाणी प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झालाय. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून जामखेडच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 138.84 कोटी रुपये खर्चास मान्यता मिळालीय. राज्य सरकारने याबाबत सुधारीत खर्चासह प्रशासकीय मान्यता दिलीय. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत माहिती दिली. तसेच यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जामखेडच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं.


रोहित पवार म्हणाले, “जामखेड शहराचा पाणी प्रश्न हा मतदारसंघात मोठा कळीचा मुद्दा बनला होता. 5 वर्षे मंत्रीपद आणि पालकमंत्री असतानाही प्रा. राम शिंदे यांना हा प्रश्न सोडवता आला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या प्रचारात जामखेडला आले असताना त्यांनी ही योजना मंजूर झाल्याचे पत्र दाखवून निवडणुकीला हवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो केवळ निवडणूक फंडा असल्याचंच नंतर स्पष्ट झालें. मात्र मी आमदार झाल्यानंतर या योजनेचा पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता, सुधारीत तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष निधी मिळवणे ही सर्व कामे केली.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post