'जनशक्ती'तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात....

'जनशक्ती'तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात....नगर:  शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मौजे कांबी येथील नांदणी-चांदणी नदीला पूर येऊन यापुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. यामध्ये काही घरांची पडझड झाली असून बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे देखील मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

            दि.(०६) रोजी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी मौजे कांबी येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी जनशक्तीचे गुलाब दसपुते, भागचंद मगर, रोहिदास पातकळ, अकबर शेख, संभाजी टाकळकर, दिपक घोलप, ज्ञानदेव कर्डिले, विठ्ठल भारुड, भास्कर भेरे, अशोक घोलप, विश्वास कर्डिले, विठ्ठल भारुड, रावसाहेब शिंदे, बाजीराव गाढे, बालाजी चांदे, मुरलीधर ईसरवाडे, ज्ञानदेव मस्के, विश्वास शहाणे, गौतम गोर्डे, सर्जेराव साबळे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी जनशक्तीच्या वतीने नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post