महिलांच्या आरोही ढोल पथकाचे जिल्हाधिकार्‍यांनी केले कौतुक

 महिलांच्या आरोही ढोल पथकाचे जिल्हाधिकार्‍यांनी केले कौतुक

गणेश विसर्जनावेळी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिराच्या प्रांगणात वादन


नगर : महिलांना फिटनेसबाबत जागृत करणार्‍या श्रध्दा फिटनेसच्या श्रध्दा देडगांवकर यांनी चार वर्षांपूर्वी आरोही ढोल पथकाची स्थापना केली. या ढोल पथकात युवती, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असून सालाबादप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीला या पथकाने माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिराच्या प्रांगणात बहारदार वादन सादर केले. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तसेच त्यांच्या पत्नी सौ.दीपाली भोसले दोघांनीही या ढोलपथकातील महिलांचे कौतुक करून स्वत:ही ढोल वाजविण्याचा आनंद घेतला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड.अभय आगरकर, पंडितराव खरपुडे यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.
श्रध्दा देडगांवकर यांनी सांगितले की, खास मुली, महिलांसाठी हे ढोल पथक तयार करून त्यांना या पारंपरिक कलाप्रकारात पारंगत करण्याचे काम करण्यात येत आहे.  दरवर्षी गणेश विसर्जनावेळी आम्हाला शहराच्या ग्रामदैवतासमोर वादनाची संधी मिळते. यंदा स्वत: जिल्हाधिकार्‍यांनीही आमचे कौतुक केल्याने सर्वांचाच उत्साह वाढला आहे. धिरज वागस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना प्रशिक्षण देण्यात येते. येणार्‍या नवरात्रीनिमित्त गरबा डान्सच्या बॅचेस सुरु झाल्या असून इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन देडगांवकर यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post