'आयपीएल'वर पुन्हा करोनाचे संकट, सामन्याआधीच सनरायजर्स हैद्राबाद संघाचा खेळाडू बाधित...

 

आयपीएलवर पुन्हा करोनाचे संकट, सामन्याआधीच सनरायजर्स हैद्राबाद संघाचा खेळाडू  बाधित



मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात स्थगित झालेली इंडियन प्रिमीयर लीग   19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु झाली आहे. पण सुरुवातीचे तीन सामने होताच एक मोठं संकट पुन्हा आय़पीएलसमोर उभ येऊन ठाकलं आहे. कोरोना महामारीने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये शिरकाव केला आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघाचा खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन याला कोरोनाची बाधा झाली आहे. आजच हैद्राबाद संघाचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. पण त्यापूर्वीच ही बातमी समोर आली आहे.

टी नटराजन कोरोनाबाधित आढळताच हैद्राबाद संघातील सहा सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं असून आज होणाऱ्या सामन्यावर मात्र कोणतं संकट नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post