महामार्गाच्या दुरवस्थेमुळे खा.विखे भडकले, ठेकेदाराला काळे फासण्याचा इशारा

 

महामार्गाची दुरवस्था, ठेकेदाराला काळे फासण्याचा इशारानगर: नगर मनमाड महामार्गासाठी केंद्र सरकारकडून 450 कोटी रुपये मंजूर करून तशी वर्कऑर्डर देखील दिली गेली आहे. पावसाच्या कारणास्तव रस्त्याच्या कामाला विलंब होत असेल परंतु येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होईल असा विश्वास नगर दक्षिणचे खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यानंतरही काम सुरू न झाल्यास ठेकेदाराला पकडून तोंडाला काळे फासू , असा इशारा  त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.


नगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी सकाळी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची भेट घेऊन सत्कार केला यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  खड्ड्यांसाठी वारंवार चर्चेत असलेल्या नगर मनमाड महामार्गासाठी खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या महामार्गासाठी 450 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. तसेच रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील देखील दाखवला आहे.

यावेळी खा.डॉ विखे पाटील  यांनी सांगितले की पावसाळ्या अभावी कामाला उशीर होत आहे, तोपर्यंत खड्डेे बुजवण्यासाठी माजीमंत्री विखे पाटील यांनी आदेश दिले आहेत असे सांगत येत्या पंधरा दिवसांत सदरच्या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post