मोठी बातमी... रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत...केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट...

 

मोठी बातमी... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर असणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील नक्षलवादी कारवायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर सोमवारी आढावा बैठक पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. 

नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी 26 सप्टेंबर रोजी देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत राज्यातील नक्षलवाद विषयक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आता उद्धव ठाकरे राज्यातील नक्षलवादी कारवायांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती देतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post