लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, आरोपीला अटक

 लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, आरोपीला अटकनगर: लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वेळोवेळी अत्याचार झाल्याची घटना संगमनेर शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

एका 18 वर्षाच्या युवतीची अकोले नाका परिसरात राहणार्‍या अरबाज पठाण याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. या प्रेमाचा गैरफायदा घेत अरबाज याने लग्नाचे आमिष दाखवून सदर युवती सोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिला. यामुळे सदर युवतीने दि. 10 रोजी राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन केला.

तिला औषधोपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर युवती शुद्धीवर आल्याने पोलिसांनी तिचा जबाब घेतला. या जबाबावरून पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली. युवतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अरबाज पठाण रा. अकोले नाका, संगमनेर याच्याविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post