शेवगाव पाथर्डीत जिंकण्यासाठी जयंत पाटील यांनी सांगितला 'मायनस प्लस'चा फॉर्म्युला

 *पाथर्डी - शेवगाव विधानसभा मतदारसंघात मायनस झालेली मते येणाऱ्या निवडणुकीत प्लस कशी होतील यासाठी प्रयत्न करा-जयंत पाटील*

*राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा सातवा दिवस...*अहमदनगर - पाथर्डी दि. ३० सप्टेंबर - मागच्या निवडणुकीत पाथर्डी - शेवगाव विधानसभेत पराभव झाला तरी आपल्या उमेदवाराला लक्षणीय मते मिळाली हे नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे मायनस झालेली मते येणाऱ्या निवडणुकीत प्लस कशी होतील यासाठी प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाथर्डी येथे केले. 


येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीची संख्या वाढवायची असेल तर गणित सुधारले पाहिजे आणि गणित सुधारले तर येणार्‍या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे आपल्याला 

लढाई करायची असेल तर सैन्य तयार पाहिजे बुथ कमिट्या तयार करून त्यादृष्टीने प्रयत्न करा असेही जयंत पाटील म्हणाले. 


भगवानगडाच्या पाण्याच्या प्रश्नावर मुंबईत आढावा बैठक घेईन असा शब्द यावेळी जयंत पाटील यांनी दिला.


काही वर्षांपूर्वी पाथर्डीचे लोक माझ्याकडे आले होते तेव्हा भगवानगडाला 'ब' गटाचा दर्जा मिळवून दिला होता. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून भगवानबाबाची सेवा झाली याचे मला समाधान वाटते असे सांगतानाच या गडावर जाऊन भगवानबाबांचं दर्शन घ्यावं अशी इच्छा होती मात्र कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने यंदा ते शक्य झाले नाही. मी लवकरच स्वतंत्रपणे भगवानबाबांच्या दर्शनासाठी येईन असा शब्द पाथर्डीकरांना जयंत पाटील यांनी दिला. 


पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. काही दिवसापासून मराठवाडयाला अतिवृष्टीला सामोरे जावे लागले.सरकारच्यावतीने पंचनामे तात्काळ सुरू करण्यात आले आहेत. लवकरच सरकार शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिला जाईल असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. 

कोरोना आल्याने सगळ्याच गोष्टीत सरकारने हात आखडता घेतला होता परंतु आता सरकार नक्कीच मदत करेल. संसारातील अडचणी सरकारने आता सांगत राहू नये तर त्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही जयंत पाटील म्हणाले


राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा सातवा दिवस असून अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी - शेवगांव विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. 

यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले,क्षितिज घुले, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ॲड. प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले,पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगांव तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, युवक जिल्हाध्यक्ष संजय कोळगे, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post