पाणीपुरवठा व पथदिव्यांचे वीज बिल न भरल्यास सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई...

 पाणीपुरवठा व पथदिव्यांचे वीज बिल न भरल्यास सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई...राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोधनागपूर : गावातील पाणीपुरवठा आणि स्ट्रीट लाईटचे वीजबील ग्रामपंचायतीने भरावे असा निर्णय राज्य सरकारनं घेतला. बील न भरल्यास सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई केली जाईल असे परिपत्रकही राज्य सरकारने काढलं आहे. सरकारच्या या निर्णयाचा भाजपने तसेच माजी उर्जीमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी निषेध केला आहे. तसेच हा निर्णय लवकरात लवकर परत घ्यावा अशी मागणीदेखील बावनकुळे यांनी केली. राज्य सरकारने हा निर्णय परत घेतला नाही, तर आगामी काळात भाजपकडून राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

राज्य सरकारने वीजबिलासंदर्भात राज्य सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार गावातील स्ट्रीट लाईट तसेच पाणीपुरवठ्याचे वीजबील ग्रामपंचायतीला भरावे लागणार आहे. तसेच हे बील न भरल्यास संबंधित ग्रामसवेक तसेच सरपंच यांच्यावर कारवाई केली जाईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. सरकारच्या याच निर्णयाविरोधात भाजपने दंड थोपटले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post