ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आमदार शरद रणपिसे यांचं निधन

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आमदार शरद रणपिसे यांचं निधन पुणे : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, तथा विधान परिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

शरद रणपिसे यांच्याा हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. गेली चार ते पाच दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post