सोनोग्राफीच्या बहाण्याने तरूणीशी अश्लिल चाळे, भाजप नगराध्यक्ष असलेल्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

सोनोग्राफीच्या बहाण्याने तरूणीशी अश्लिल चाळे, भाजप नगराध्यक्ष असलेल्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल बीड : 19 वर्षीय तरुणीची सोनोग्राफी करण्याचा बहाणा करत थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये नेऊन डॉक्टरने तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्याविरुद्ध बीडच्या धारूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी डॉक्टर हे भाजप नेते असून धारूर नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने 19 वर्षीय तरुणीला थेट सोनोग्राफी सेंटरमध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वरुपसिंह हजारी यांच्यावर करण्यात आला आहे.दरम्यान, हा आरोप खोटा असल्याचा दावा करत हा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी डॉक्टर संघटना आणि हजारी यांचे समर्थक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत.दुसरीकडे, आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post