गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी लागू

पुणे शहरात गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी लागू पुणे : पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी खबरदारी म्ह्णून गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी (१४४ कलम) लागू करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १० ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी हा आदेश लागू करण्यात आला असून उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे शहर पोलिस सहायुक्त डॉ.  रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. त्याबरोबरच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून शहर पोलीस दलाकडून ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


कोरोनाला रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पोलिस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यास तसंच संचार करण्यास मनाई असे आदेश लागू केले आहेत. पुढचे दहा दिवस हे आदेश लागू राहणार असून याचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post