देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राबाहेर...पक्षाने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राबाहेर...पक्षाने सोपवली महत्त्वाची जबाबदारी नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षानं महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात भाजपचं नेतृत्त्व करणारे फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भाजप नेतृत्त्वानं गोवा विधानसभेचे प्रभारी म्हणून फडणवीस यांची नियुक्ती केली आहे. याआधी बिहार विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली आहे. 

गोवा विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. गोवा राज्य आकारानं लहान आहे. मात्र ते संवेदनशील समजलं जातं. गोवा बराच काळ अस्थिर राहिलं आहे. मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्त्वाखाली गोव्याला स्थिर सरकार मिळालं. मात्र त्यांच्या निधनानंतर गोवा भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला गोव्यात १३ जागा मिळाल्या. त्यांच्या ८ जागा कमी झाल्या होत्या. काँग्रेसनं १७ जागा जिंकल्या. मात्र काँग्रेसपेक्षा कमी जागा जिंकूनही भाजपनं छोट्या पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post