मी फरार नाही, अटकपूर्व जामीन घेणार नाही...


मी फरार नाही, अटकपूर्व जामीन घेणार नाही... 

विनयभंगाचा गुन्हा दाखल असणार्‍या काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंचे स्पष्टीकरण 



नगर : विनयभंग गुन्हा प्रकरणात मला अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे. फरार आहे. अशा प्रकारच्या वावड्या, अफवा  शहरात जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत. मी कुठेही पळून गेलेलो नाही. फरार नाही. मी इथेच नगर शहरामध्ये असून मी विनयभंगाचा माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या बाबतीत अटकपूर्व जामीन घेणार नाही. कारण मी गुन्हा केलेलाच नाही, असे स्पष्टीकरण शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 


आयटी पार्कची काँग्रेसच्यावतीने किरण काळे यांनी पोलखोल केल्यामुळे नगर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे किरण काळे आणि राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सातत्याने सुरू आहेत. त्यातच अटकेच्या भीतीपोटी काळे यांनी शहरातून पळ काढला असून ते अटकपूर्व जामिनासाठी वकिलांच्या मार्फत धावपळ करीत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर काळे यांनी प्रसार माध्यमांना प्रसिद्धी पत्रक काढत माहिती दिली आहे. 


किरण काळे यांनी म्हटले आहे की, माझे दैनंदिन कामकाज सुरू असून नागरिक, कार्यकर्त्यांच्या मी भेटीगाठी घेत आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याबद्दल काँग्रेसचे कार्यकर्ते, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, शहरातील व्यापारी, उद्योजक, नागरिक यांचे असंख्य फोन मला येत आहेत. मी कोणत्याही भगिनीचा विनयभंग केलेला नाही. आयटी पार्क भेटीची वस्तुस्थिती स्पष्ट करणारी सीडी काँग्रेसने पत्रकार परिषदेत जाहीरपणे वाजवली आहे. पोलिसांच्या सर्व कारवायांना सामोरे जायची आमची तयारी आहे. विरोधकांनी आमच्यावर राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला आहे. तपास कामी पोलीस प्रशासनाला शतप्रतिशत सहकार्य करण्याची आमची भूमिका असून पोलिसांनी अटक केल्यास त्याला देखील सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे. कारण आम्ही कायदा व सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेला मानणारे आहोत. 



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post